क्षुल्लक वादातून वयोवृद्ध ढाबा संचालकाचा खून झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील शिराळा ते रामासाऊर मार्गावरील ढाब्यामध्ये २०१४मध्ये घडली होती. खुनाच्या या गुन्ह्यात न्यायालयाने शुक्रवारी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रवीण तुळशीराम कडू (३२, कळमगव्हाळ) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. दोषारोपपत्रानुसार, हत्येची ही घटना २ ते ३ जून २०१४च्या मध्यरात्री घडली होती. कळमगव्हाण येथील राजेंद्र घोंगे यांचा सामासाऊर मार्गावर ढाबा आहे. ते मुलगा राहुल यांच्यासोबत चालवित होते. तर कडू हा यांच्याकडे भाड्याने राहात होता. २ जून रोजी राहुल हा ढाब्यावर गेला होता. यावेळी ढाब्यावर त्याचे वडील राजेंद्र व प्रवीण कडू दोघेच होते. काही वेळाने राहुल घरी परत आला आणि रोडगे घेवून पुन्हा धाब्यावर गेला. वडिलांना पदार्थ दिल्यानंतर तो घरी परतला. घरी परतल्यावर घराच्या अंगणातच झोपी गेला. मध्यरात्री कडू राहुलच्या जवळ झोपला. सकाळी राहुलच्या आईस प्रवीणच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आढळून आले. ही बाब तिने राहुलच्या निदर्शनास आणून दिली. काही वेळाने प्रवीणने रक्ताचे डाग धुवून पलायन केले. ढाब्याशेजारील गावकऱ्यांनी राजेंद्र यांची हत्या झाल्याचे सांगितले. राहुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रवीण कडू याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याला त्याच दिवशी अटक करण्यात आली. तत्कालीन निरीक्षक शिरीष राठोड यांनी तपास केला. निरीक्षक राधेश्याम शर्मा यांनी २० ऑगस्ट २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान नऊ साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डब्ल्यू. डी. मोडक यांनी प्रवीण कडू याला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. मिलिंद जोशी यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास
अमरावती : अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. नज्जू उर्फ नजीर खान पीर खान पठाण (२४) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. अत्याचाराची ही घटना २३ मे २०१५ रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा गावात उघडकीस आली होती. नज्जू हा गावामध्ये व्यवसाय करीत होता. त्याने गावातील १५ वर्षीय युवतीशी संबंध प्रस्थापित केले. यातूनच तिला गर्भधारणा झाली. गर्भपात करण्यासाठी त्याने तिला गोळ्याही दिल्या होता. गर्भपात न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. २३ मे रोजी पीडितेने एका बाळाला जन्म दिला. पोलिसांनी नज्जूविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ४, ६, ८, १० व १२ तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यादरम्यान पीडितेच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी नज्जू, पीडिता व बाळाची डीएनए टेस्ट केली. यात तिघांचा डीएनए एकच असल्याचे स्पष्ट झाले. धामणगाव रेल्वेचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक राधास्वामी यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून २ ऑगस्ट २०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान दोन साक्षीदारांच्या बयान नोंदविण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट