Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

कुख्यात माओवादी उसेंडीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली

अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कसनसूर अॅक्शन टीम कमांडर तथा एलओएस सदस्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. रानू पांडू उसेंडी, रा. जवेली असे अटक केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते.

छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या जवेली गाव परिसरात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रानू गावात आला होता. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. कसनसूर येथील माओवाद्यांच्या स्थानिक पातळीवरील (एलओएस) संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला रानू २००५पासून नक्षल दलममध्ये कार्यरत होता. २००९मध्ये उपपोलिस स्टेशन कसनसूर येथे शस्त्र जप्तीच्या गुन्ह्यासह खून, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, ग्रामपंचायत जाळपोळ, चकमकी, काळे झेंडे लावणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. जिल्ह्यातील जारावंडी-कसनसूर क्षेत्र माओवादग्रस्त असून गावात सशस्त्र नक्षल संघटन, जनमिलीशिया, एरिया रक्षक दल (एआरडी), ग्रामरक्षक दल (जीआरडी) कार्यरत आहे. रानू उसेंडीच्या अटकेने या भागात जिल्हा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरम्यान उसेंडीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

तिघांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

गडचिरोली : पोलिसांसमोर शुक्रवारी तीन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. कान्हू ऊर्फ माहू सुकलू उसेंडी (२५) रा. पुन्नूर, (एटापल्ली), सूर्या ऊर्फ अंकुश ऊर्फ समुराम घसेन नरोटे (२१) रा. मोरचूल (धानोरा) आणि रामजी पांडू कवडो (२४), रा. पुसकोठी (एटापल्ली) अशी आत्मसमर्पितांची नावे आहेत.

कान्हू उसेंडी हा कसनसूर एलओएस सदस्य होता. तो २००५मध्ये दलममध्ये भरती झाला होता. २००५ ते २०१० या काळात कसनसूर दलम सदस्य असलेला कान्हू २०१०मध्ये टेक्नीकल टीममध्ये सदस्य झाला. २०१३मध्ये तो कंपनी क्रमांक दहा सेक्शन उपकमांडरपदावर कार्यरत होता. सूर्या नरोटे हा डीके डॉक्टर टीमचा सदस्य होता.४ जुलै २०१०मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन दलम सदस्य या पदावर कार्यरत होता. सप्टेंबर २०१०मध्ये माड एरियात बदली होऊन डिसेंबर २०११मध्ये बीसीटीएसमध्ये सदस्य या पदावर होता. त्याची २०१२मध्ये उपकमांडर या पदावर बदली करण्यात आली. तर रामजी पांडू कवडो हा गट्टा एलओएस सदस्य पदावर कार्यरत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>