Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

अल्पवयीन मुलांकडून घरची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर
अल्पवयीन मुलांकडून घरची कामे करवून घेतल्याप्रकरणी धनश्री येरपुडे यांच्याविरोधात जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडून धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बालसंरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नागपुरातील तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. वडीलही सोडून गेल्याने निराधार झालेली ही मुले अजनी परिसरातील चुलत मामाकडे राहायला गेली. या चुलत मामाच्या परिचित असणाऱ्या धंतोलीतील धनश्री येरपुडे यांनी या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. मामाने या तिन्ही मुलांना येरपुडे यांच्याकडे सुपूर्द केले.

या तीन मुलांमध्ये मुलगी ११ वर्षांची, एक मुलगा १४ वर्षांचा आणि एक ७ वर्षांचा आहे. यातील १४ वर्षांच्या मुलाने घरातून पळ काढला आणि चाइल्ड लाइनशी संपर्क साधून आपल्याकडून घरातील कामे करवून घेतली जात असल्याची तक्रार केली.

झाडू पोछा करणे, कपडे धुणे यासारखी कामे या मुलांकडून करवून घेतली जात होती. चाइल्ड लाइनने जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी धंतोली पोलिस ठाण्यात धनश्री येरपुडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

जुन्या कायद्याने नोंदविला गुन्हा?

येरपुडे यांच्याकडून मुलांची सुटका करण्यात आली आहे. या तिन्ही मुलांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या सीसीटीएनएस (क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टीम) या यंत्रणेमध्ये बालसंरक्षण अधिनियम २०१५ अपडेट नसल्याने गुन्हा दाखल करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे धंतोली पोलिसांकडून सांगण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया न करता अल्पवयीन मुलांना घरी ठेवून घेणे हा गुन्हाच असल्याचे सांगत येरपुडे यांच्यावर बालसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. सीसीटीएनएसमध्ये जुन्या कायद्याचीच नोंद असल्याने पोलिसांनी बालसंरक्षण अधिनियम २००६ अंतर्गत कलम २३ आणि २६ लावून गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
.......................

महाराष्ट्रातील ज्येष्ठ ना‌गरिक असुरक्षित
ज्येष्ठ नागरिक 'सॉफ्ट टार्गेट'
नागपूर, भूखंडाच्या वादातून सेंट्रल एव्हेन्यू भागात एकनाथ निमगडे (७२) यांची दिवसाढवळ्या बेछूट गोळीबार करून हत्या करण्यात आली. या घटनेने उपराजधानीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती आहे.

गतवर्षी २०१५ मध्ये राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या १६७ घटना घडल्या असून, यात १७३ वृद्धांचा जीव गेला. २०१४ मध्ये ही संख्या १७० होती. गतवर्षी ज्येष्ठांवरील प्राणघातक हल्ल्याच्या ६२ प्रकरणांमध्ये ६३ वृद्ध जखमी झालेत. २०१४ मध्ये जखमींची संख्या ५४ होती. यात नऊने वाढ झाली आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. तामिळनाडूत १६२ घटनांमध्ये १६८ वृद्धांची हत्या करण्यात आली, तर ७२ ज्येष्ठांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून, या राज्यात १५४ जणांची हत्या झाली. राज्यातील नागरिक असुरक्षित असून, त्यांच्यावर होणाऱ्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे एनसीअीबीने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

अत्याचाराच्या सर्वाधिक घटना

पुरोगामी महाराष्ट्रातील ज्येष्ठ महिलाही सर्वाधिक असुरक्षित असल्याचे तथ्य समोर आले आहे. राज्यातील ज्येष्ठ महिलांवरील नऊ अत्याचाराच्या घटना घडल्या. २७ ज्येष्ठाकडे दरोडा टाकण्यात आला. केरळ व छत्तीसगडमध्ये प्रत्येकी पाच ज्येष्ठ महिलांवर अत्याचार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक 'सॉफ्ट टार्गेट'

लुटपाटीसाठी चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट ज्येष्ठ नागरिक असून,त्यातही महाराष्ट्राचा प्रथम क्रमांका लागतो. राज्यात लुटपाटीच्या सर्वाधिक ७१८ घटनांमध्ये ७२० ज्येष्ठांकडील ऐवज व रोख हिसकावण्यात आल्या. बिहारमध्ये सात, तर उत्तरप्रदेशात १८ ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यात आले. कर्नाटकामध्ये ११८ ज्येष्ठ नागरिकांना तर मध्यप्रदेशात ८८ वृद्धांना लुटण्यात आल्याची नोंद आहे.

एकूण घटनांमध्ये पाचशेनी वाढ

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांबाबत घडलेल्या घटनांमध्ये २०१४पेक्षा २०१५मध्ये पाचशेनी वाढ झाली आहे. गतवर्षी राज्यात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराच्या ४५८१ घटना घडल्या असून ,२०१४मध्ये ही संख्या चार हजारांच्या जवळपास होती. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेशात ३५२६ घटनांनी नोंद घेण्यात आली. गतवर्षी १९२३९ घटनांमध्ये १९५६२ वृद्ध पीडित आहेत.

अटकेबाबतही दुसऱ्या स्थानी

आरोपींच्या अटकेबाबतही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्येष्ठ नाग‌रिकांच्या हत्या प्रकरणांमध्ये ४४९ आरोपींना अटक करण्यात आली. यात ९ महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रात २४० पुरुष, व १८ महिला अशा एकूण २५८ मारेकऱ्यांना अटक कण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>