Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

गोहत्याबंदी सर्वांच्याच मुळावर!

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर
कोणताही विचार न करता महाराष्ट्र सरकारने गोहत्यांबदी जाहीर केली. केवळ मुस्लिमांना धक्का देण्यासाठी जरी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्याचे परिणाम अनेक जातींवर किंबहुना सर्व समाजावर झाले आहेत. कोणताही अभ्यास न करता घेतलेल्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी, दलित, बहुजन आणि आदिवासींचे नुकसान झाले असल्याची कठोर टीका ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी नागपुरात केली.

डॉ. आंबेडकर अॅ‌ग्रिकोज असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित 'विदर्भातील शेतीः आव्हाने आणि पर्याय' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. विदर्भ आणि महाराष्ट्रातील शेती, शेतकरी, पाण्याची समस्या आणि शासकीय धोरणांमधील चुका आदी विषयांवर साईनाथ यांनी आकडेवारीसह प्रकाश टाकला. शेतीबाबतचे कोणतेही ज्ञान नसल्यासारखा गोहत्याबंदीचा निर्णय सरकारने घेतल्याचे अनेक दुष्परिणाम ग्रामीण जनतेला भोगावे लागत असल्याचे ते म्हणाले. देशात मागील वीस वर्षांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तर आत्महत्यांची संख्या कमी दाखविण्यासाठी सर्व प्रकारचे संख्याशास्त्रीय प्रयत्न करण्यात येत आहेत. बटईने शेती कसणारे शेतकरी, जंगलाजवळ राहणारे आदिवासी, महिला शेतकरी यांच्या देखील आत्महत्या आहेत. मात्र, त्या शेतकऱ्यांच्या नव्हे तर शेतमजुरांच्या आत्महत्या म्हणून दाखविल्या जातात किंवा इतर गटात टाकून दिल्या जातात. या गटातील लोकांच्या नावावर जमिनीचे पट्टे नसल्याने त्यांच्या आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणून मोजल्याच जात नाहीत. यामुळे, शासकीय स्तरावरून जाहीर होणारी आकडेवारी ही धूळफेक करणारी आणि फसवी आहे, असा दावा साईनाथ
यांनी केला.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालातून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर येऊ शकते. मात्र, यंदा ती अद्यापही जाहीरच करण्यात आलेली नाही. १२ राज्ये आण‌ि ६ केंद्रशासित प्रदेश यांनी आत्महत्यांची संख्या शून्य दाखविली आहे आणि हे कसे काय शक्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धोरण लकव्याने शेतकरी आत्महत्या

शेती प्रश्न बिकट होण्यामागे मुळात चुकीची सरकारी धोरणेच कारणीभूत आहेत. राष्ट्रीयस्तरावर घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका हजारो लहान शेतकऱ्यांना बसतो. पाण्याचे विषम वाटप, पाणीस्रोतांना नुकसान यासारख्या मानवी चुकांमुळे प्रश्न जटील झाले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे गाव सोडलेला शेतकरी शहरातील इमारतींमध्ये जलतरण तलाव बांधण्यासाठी मजूर म्हणून काम करीत आहे. आहे. चुकीच्या धोरणांनी आपले नुकसान होत असल्याची जाणीव विदर्भातील शेतकऱ्यांना आहे. म्हणूनच येथील शेतकऱ्यांनी आपल्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठ्या या राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहून ठेवल्या आहेत, असेही साईनाथ म्हणाले.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>