गोंडखैरी जि. प. प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री म्हणाले, शुद्ध पाणी, आरोग्य, फवारणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन या कामांसाठी शासन प्राधान्याने अनुदान देणार आहे. नागरिकांनी आता प्रशासनाकडून कामे करून घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने सर्वांना घरकुले मिळणार आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्यांना लाभ होईल. यासाठीची बीपीएलची अट आता निघाली आहे. रेशन धान्य दुकानांतून सर्वांना धान्य मिळेल. येथूनही एपीएल, बीपीएलची अट बाजूला होणार आहे. मशिनवर अंगठा ठेवला की, धान्य मिळणार त्यामुळे आता काळाबाजार होणार नाही.
जिपच्या ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी सीईओंना दिले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, माजी जि. प. अध्यक्ष रमेश मानकर, दिलीप जाधव, सोनबा मुसळे, सरपंच गीताताई हावरे, उपसरपंच हेमराज पोहनकर, श्रीमती मांडवकर, अजय वाठकर, ब्राम्हणीच्या कार्यक्रमात राजेश जीवतोडे, संजय टेकाडे, किशोर रेवतकर, दादाराव मंगळे, उमेश्वर मावळकर, शुभांगी वैद्य, धापेवाडा येथील कार्यक्रमात जि.प. सदस्या अरुणा मानकर, अशोक धोटे, मीना तायवाडे, प्रकाश टेकाडे, प्रेम झाडे, दिलीप धोटे, प्रमोद हत्ती, संदीप उपाध्ये, बेबीबाई धुर्वे, गजानन आवारी, डॉ. मनोहर काणे, सतीश मिश्रा, संजय निमजे, बन्सीलाल कुमरे, मंगेश कोटाडे, विनोद धोटे, शेखर वैद्य, संजय काळे, संजय चालखोर, दुर्गादास तभाने, भाऊराव अतकरी, मौदनकर, प्रवीण गमे उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट