Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

वीजग्राहकांना मिळणार व्याज

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

महावितरणकडून वीजग्राहकांना यावेळी नियमित वीजबिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. शिवाय, वीजग्राहकांनी या बिलाचा वेळीच भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महावितरणकडे सुरक्षा ठेवीवर नावावर जमा झालेल्या नागपूर परिमंडळातील लघुदाब वीजग्राहकांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १० कोटी ९५ लाख ५० हजार ५३३ रुपयांचे व्याज दिले जाणार असल्याची माहिती आहे. या माध्यमातून बिलात काही सूट ग्राहकांना या व्याजरूपात मिळेल.

सुरक्षा ठेवीमध्ये नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना ८ कोटी ३८ लाख ७९ हजार २२७ रुपये तर वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना २ कोटी ५६ लाख ७१ हजार ३२६ रुपयांचे व्याज मिळणार आहे. व्याजाची ही रक्कम लवकरच ग्राहकांच्या वीजबिलात समयोजित करण्यात येईल. सुरक्षा ठेव म्हणजे काय, दरवर्षी ती का घेतली जाते, त्यावर व्याज मिळते का, असे अनेक प्रश्न सामान्य वीज ग्राहकाला नेहमीच भेडसावत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फे वापरली जाते, एवढेच नव्हे तर त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिले जाते. ग्राहकांनी भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतूनच वीजखरेदी, वीजवहन, वीज वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविला जातो. अशावेळी ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरले तरच वीजखरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते.

सुरक्षा ठेव म्हणजे काय?

वीजग्राहकांना मिळणारे विजेचे बिल हे एक महिना आधी वापरलेल्या विजेपोटी दिले असते, म्हणजेच आधी वापर व त्यानंतर बिल असा हा क्रम आहे. वीजबिल आल्यानंतरच ग्राहक ते भरत असतो. म्हणजेच वीजबिल आल्यानंतर ते भरण्यासाठी साधारणत: १८ ते २१ दिवसांचा कालावधी ग्राहकाकडे असतो. त्यानुसार वितरित केलेल्या विजेचे पैसे महावितरणकडे सुमारे दीड महिन्यानंतर येतात. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वीज कायदा २००३ च्या कलम ४७ च्या उपकलम (५) व उपकलम (१) अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वितरण कंपनीकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. ग्राहकाला आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरीइतके वीजबिल सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनीकडे जमा करावी लागते. याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीजवापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निर्धारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>