माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंअरनेटचा झपाट्याने प्रसार झाला आहे. पूर्वी सायबर कॅफेपर्यंत मर्यादित असलेले इंटरनेट घराघरापर्यंतच नव्हे तर प्रत्येकाच्या खिशात पोहोचले आहे. यात आता बेसिक इंटरनेट म्हणजे वायर कनेक्शनच्या आधारे चालणाऱ्या नेट जोडणीपेक्षा वायरलेस मोबाइल इंटरनेटची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आजमितीला ११ कोटी २१ लाखाच्या आसपास आहे. तर ‘ट्राय’ने जाहीर केलेली मोबाइल इंटरनेट युजर्सची संख्या मुंबई आणि महाराष्ट्र सर्कल मिळून सुमारे ११ कोटीपर्यंत पोहोचली आहे.
‘ट्राय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रत्येक व्यक्तीजवळ किमान दोन मोबाइल सिमकार्ड जोडणी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दर शंभरामागे ३६.९४ इतके मोबाइल इंटरनेट वापरकर्ते झाले आहेत. मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात आघाडीवर आहे. ‘ट्राय’नुसार मोबाइल कंपन्यांना मिळणारा महसूल पूर्वी मासिक भाडे आणि कॉल्स, एसएमएस याच्या माध्यमातून सर्वाधिक होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात दुप्पटीने वाढ झाली आहे.
घरामागे पाच मोबाइल
मोबाइल कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, एका कुटुंबामागे किमान पाच मोबाइल व कमाल दहा जोडणी आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किमान दोन सिम जोडणी असे समीकरण आता होत आहे.
कोण वापरतेय काय?
कॉलिंग : १२.५४ टक्के
एसएमएस : १३.६९ टक्के
इंटरनेट : ५३.७७ टक्के
व्हॅल्यू अॅडेड सेवा : २०.०० टक्के
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट