‘दीक्षाभूमीवर देशभरातून अनुयायी येतात. यात श्रीमंतच नव्हे तर गरिबांचाही समावेश असतो. अशा अनुयायांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे. या सेवेने मानसिक समाधान व आशीर्वाद मिळते’, असे प्रतिपादन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. संजीवनी सखी संघ, समता जेसीस, ब्ल्यू गार्ड यांच्यातर्फे दीक्षाभूमीवर निःशुल्कपणे विविध सेवाभावी कार्य दरवर्षी करण्यात येते. या सेवेच्या वितरण प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. या सेवाकार्यात आयुक्तांच्या पत्नी आदिती हर्डीकर यांचाही समावेश होता.
आमदार डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमळे, नगरसेवक मुरली मेश्राम, प्राचार्य रमेश माटे, राज फुले, अशोक कोल्हटकर, नारायण चवरे, कल्पना मेश्राम, विभा गजभिये, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. सरिता माने, सुरेंद्र माने, प्रा. नागसेन रामटेके, प्रभाकर कांबळे, अशोक जवादे, सुमेध उके, पमिता कोल्हटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी औषध, पाणी पाउच, फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सुमारे तीन लाख अनुयायांना हे वितरण करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘अंगुलीमाल’चे सादरीकरण
दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘अहिंसक’ अंगुलीमाल हिंदी महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यापूर्वी ‘आईसाहेब रमाई’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते. ‘अंगुलीमाल’ महानाट्याच्या सादरीकरणावेळी स्मारक समिती अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले उपस्थित होते. या महानाट्याचे निर्माते, लेखक, गीतकार, दिग्दर्शक प्रेमकुमार उके आहेत. मृणाल यादव यांचे मुख्य दिग्दर्शन होते. निर्माण सम्राट गोटेकर व प्रणित पोचमपल्लीवार यांनी केले. बाबा पदम यांची प्रकाशयोजना, सौरभ यांची ध्वनियोजना होती. समीरकुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले. नकुल श्रीवास यांनी रंगभूषा तर प्रियंका बोंडनासे यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली. या महानाट्यात एकूण ५० कलावंतांचा समावेश होता. शक्ती रतन, अरुणा पटेल, संजय रंधे, राहुल बारापात्रे, अश्वीन वाघाडे, संगीता नागदिवे, अनिता तोटेवार, राज काळे, रिनल डोंगरे, आशिष मांडवकर, अश्विनी मांडवकर, शुभम गजभिये, इशान बाबु, गजेंद्र तुमाने, काजल तिवारी या प्रमुख कलावंतासह इतरही कलाकारांचा समावेश होता.
समता सैनिक दलाची उत्कृष्ट सेवा
साठाव्या धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमीत्त दीक्षाभूमीवर ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधी समता सैनिक दलाने सेवा व व्यवस्था शिबिराची जबाबदारी सांभाळली. यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, दिल्ली व नागविदर्भातून एक हजारांहून अधिक सैनिकांनी भाग घेतला. भदन्त नागदीपंकर, राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे, रावसाहेब राऊत, राजकुमार वंजारी, दुर्गेश थुल, प्रमोद खांडेकर, सुनीत ढवळे, चिंटू गजभिये, आकाश मोटघरे, रोशन नागदेवे, युवराज कावळे, प्रा. भावेश माटे, प्रमिला सिद्धार्थ, प्रा. संजय घोडके यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सैनिकांचा समावेश होता. येणाऱ्या लाखो अनुयायांना मार्गदर्शन करून त्यांना आवश्यक ती सेवा देण्यात दलाने परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट