एक फटाका फुटण्यापूर्वी कानावर हात ठेवावा लागतो, दिवाळीसाठी लावण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानात फटाक्यांचा मोठा साठा करून विकावा लागतो. अशावेळी फटाका विक्रेत्याकडून झालेली एक चूक खूप महागात पडू शकते. फटाक्यांच्या दुकानांना आगी लागून झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन फटाके विक्रेत्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी त्वरित निदर्शनास आणून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दिवाळी आता अवघ्या आठ दिवसांवर आली असल्याने फटाक्यांची दुकाने सजू लागली
आहे. सुतळी बॉम्ब, चक्री, अनार, रॉकेट यांसह
एकाचवेळी वेगवेगळ्या आवाज आणि रंगांची उधळण करणाऱ्या फटाक्यांनी दुकाने सजली आहेत. बच्चेकंपनीपासून मोठ्यांचीही पावले आता या दुकानांकडे वळू लागतील. अशावेळी कुठलीही दुर्घटना न होता दिवाळी हा प्रकाशाचा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी घडलेल्या घटनांमधून हा बोध घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हे नियम लक्षात ठेवा
-दुकांनांसाठी निर्धारित करून दिलेल्या जागेच्या आतच फटाक्यांचा साठा ठेवा.
-क्षमतेपेक्षा जास्त फटाक्यांचा साठा करू नये, दुकानाच्या आता ग्राहकांना घुसू देऊ नका.
-दुकानाच्या बाहेर रेतीने भरलेल्या बादल्या, पाण्याने भरलले ड्रम यासह अग्निशमन यंत्राची व्यवस्था असावी.
-फटाक्यांसोबत माचिस, पेपर केप्स यांसारखे किंवा ज्यात क्लोरेट मिक्श्चर असेल ते ठेऊ नका.
-लोखंड्याच्या वस्तू फटाक्यांच्या जवळ ठेऊ नका, फटाक्यांचे पॅकिंग उघडे करून ठेऊ नका,
-दुकानाचे शटर उघडल्यानंतर त्याला स्टापर लावा, दुकानाच्या बाहेर पेंडॉल किंवा इतर शेड तयार करू नका.
-दुकानात बल्ब लटकवून ठेऊ नका, हलणार नाही अशा स्थितीत लावा,
-अधिक सुरक्षेसाठी एमसीबी लावा, कर्मचाऱ्यांना खबरदारीचे प्रशिक्षण द्या.
-फटाक्यांचा वापर कसा कारायचा, याची माहिती पॅकेटवर लिहिली नसेल असे फटाके विक्री करू नये.
-ध्वनिमान विस्फोटक नियमानुसार १२५ डेसिबलपेक्षा जास्त फटाक्यांचा वापर करू नका.
-विस्फोटक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नागरिकांना जाण्यासाठी सुरक्षित रस्ता असावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट