सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणारा, संस्कृतीच्या आणि जीवनशैलीच्या साऱ्या अंगांना स्पर्श करणारा ‘मटा कल्चर क्लब’ घेऊन आला आहे झटपट मेकअप आणि हेअरस्टाइल शिकण्याची सुवर्णसंधी. रविवार, ६ नोव्हेंबर रोजी इन्स्टंट मेकअप अॅण्ड हेअरस्टाइल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले असून वेळ आणि स्थळ लवकरच कळविण्यात येणार आहे.
संगीत, साहित्य, नृत्य, नाट्य, शिल्प अशी विविध सांस्कृतिक मनसोक्त पर्वणी आणि खाद्यपदार्थांपासून ते आनंदी जीवनापर्यंत विविध विषयांवर टिप्स, असे वैविध्य घेऊन येणाऱ्या ‘मटा कल्चर क्लब’ला नागपूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. क्लबचे सदस्य होण्यासाठी नागपूरकर उत्सुक असून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात रोज उत्साहात नोंदणी सुरू आहे.
‘कल्चर क्लब’चा पहिला कार्यक्रम येत्या रविवारी आयोजित करण्यात आला असून आतापर्यंत ‘कल्चर क्लब’चे सदस्य झालेल्यांना कार्यशाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. इतरांसाठी कार्यशाळा स्थळी सदस्य नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. क्लबचे सदस्य नसणाऱ्या महिलांसाठी २०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहिती व सदस्य नोंदणीकरिता ०७१२-६६६०७०२ किंवा ७०२८९९०६९२ या क्रमांकावर दुपारी १२ ते ५ या दरम्यान संपर्क साधावा.
क्लब सदस्यांना मोफत प्रवेश
‘कल्चर क्लब’च्या सदस्यांना इन्स्टंट मेकअप अॅण्ड हेअरस्टाइल वर्कशॉपमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. क्लबचे सदस्य नसणाऱ्या महिलांसाठी २०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सदस्य नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट