महापालिका निवडणुकीत शतक गाठण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे. पक्षाने सहा मंडळांचे आणि ३८ प्रभागांसाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करून उद्दिष्टपूर्तीसाठी पक्षाचे ध्येयधोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्ट्रॅटेजीवर खलबत केले.
शहरातील नेते व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सीताबर्डी येथील सेवासदन सभागृहात विशेष बैठक झाली. भाजपचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सर्व नियुक्त्यांची माहिती दिली. आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार अनिल सोले, राजेश बागडी आदींनी निवडणुकीच्या तयारीतील बारकावे सांगितले. येत्या १० ते २० नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक प्रभागात दिवाळी स्नेहमिलन आयोजित करण्यात येणार आहे. प्रभागातील किमान २५० मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित राहतील, याची काळजी घेण्यात येणार आहे.
मंडळ प्रभारी- उत्तर नागपूर- गिरीश व्यास, दक्षिण-पश्चिम नागपूर- राजीव हडप, पूर्व- श्रीकांत देशपांडे, मध्य- राजेश बागडी, दक्षिण- बळवंत जिचकार, पश्चिम नागपूर- जयप्रकाश गुप्ता, सहप्रभारी- रमेश गिरडे. निवडणूक प्रमुख- मध्य- कृष्णा कावळे, दक्षिण-पश्चिम नागपूर- दिलीप गौर, पूर्व नागपूर- महेंद्र राऊत, दक्षिण- संजय ठाकरे, दक्षिण-पश्चिम नागपूर- प्रकाश भोयर, पश्चिम- किसन गावंडे. प्रभाग संयोजक- विक्की कुकरेजा, अशोक मेंढे, गणेश कानतोडे, शेषराव गोतमारे, वामन लांजेवार, भोलानाथ सहारे, प्रभाकर येवले, प्रमोद दहिकर, बाबा बनकर, नवनीत श्रीवास्तव, आसिफ खान, सतीश वडे, हिरू चौधरी, बाबा दादुरिया, रूपा राय, राजेंद्र मुंडले, सुनील काटगाये, भारत गुरुजी, कमलेश राठी, रामभाऊ आंबुलकर, शरद पडोळे, अनिल मानापुरे, श्याम मदान, सेतराम सेलोकर, अनिल कोडापे, देवेंद्र काटोलकर, योगेंद्र साहू, डॉ. राजेश गादेवार, भगवान मेंढे, अजय बुगेवार, रवी अंबाडकर, किशोर बागडे, विकास बुंदे, नाना आदेवार, रमेश भंडारी, ईश्वर ढेंगळे, विमल श्रीवास्तव, मुकुंद घुगरे. सरचिटणीस संदीप जोशी यांनी संचालन केले. बैठकीस किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.
जनसंवाद
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागातील इच्छुक, दावेदार ‘घर घर मोदी’ प्रमाणे घरोघरी संपर्क साधून मतदारांशी संवाद साधतील. २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान चालणाऱ्या अभियानात मंडळ प्रभारी, निवडणूकप्रमुख आणि प्रभाग संयोजकदेखील सहभागी होणार आहेत. निवडणुकीपूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट