चौकाचौकात तैनात असलेले वाहतूक पोलिस खर्रा खातात. कारवाई करतानाही त्यांच्या तोंडात खर्रा असतो. त्यामुळे पोलिसांबाबत तिरस्कार वाटायला लागतो. फुटपाथवरील अतिक्रम हटविणे आवश्यक आहे. अनेक मॉल्स, हॉस्पिटल व इमारतींमध्ये पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. झेब्रा क्रॉसिंग, इंडिकेशेन बोर्ड, सिग्नल दुरुस्ती करणे, तसेच स्टॉप लाइन अनेक चौकात नाहीत. महापालिकेने या सुधारणा त्वरीत कराव्यात, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. सर्व सल्लागार समिती सदस्य व नागरिकांकडून सूचना व उपाय मागविण्यात आले. बैठकीला महापालिकेचे अधिकारीही उपस्थित नव्हते.
राजकीय हस्तक्षेप थांबवा
ऑटोंविरुद्ध कारवाई केल्यास मंत्री व नेत्यांचे फोन पोलिस अधिकाऱ्यांना येतात. त्यामुळे पोलिस कारवाई करीत नाहीत. कारवाईबाबत होणारा राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट