Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

शंभर किलोमीटरची आज सायकलफेरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

फिटनेस अथवा दैनंदिन कामांसाठी पुन्हा एकदा सायकलचा ट्रेण्ड संत्रानगरीत रुजत आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी सायकल ही इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना चांगला पर्याय ठरू शकते. हा संदेश देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर आणि आयपीएस अधिकारी दीपाली मासिरकर दिवाळीच्या पर्वावर आरोग्याचा मंत्र देण्यासाठी आज, रविवारी आयोजित १०० कि.मी. अंतराच्या पॉप्युलरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह आणखी ९८ नागपूरकर या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

पाश्चिमात्य देशांमध्ये शतकापूर्वी असे प्रयत्न झाले. त्यामुळेच तिथे सायकलचा ट्रेंड रुजला. नागपुरातही असे इकोफ्रेण्डली कल्चर रुजावे, यासाठी ही पॉप्युलरी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जवळजवळ ९८ सायकलपटूंनी नोंदणी केली आहे. यात वैद्यकीय क्षेत्रापासून ते सनदी लेखापालसारख्या क्षेत्रांमधील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होत आहेत. आरोग्यदायी दिवाळी असा संदेश देणाऱ्या या सायकल स्पर्धेत महिलांचादेखील मोठ्या संख्येने सहभाग असेल. सकाळी ५.४५ वाजता झिरो माइल चौकातून राइडला सुरुवात होईल. यात सहभागी होणाऱ्या सायकलपटूला पागलखाना चौकमार्गे, कोराडी, पाटणसावंगी, सावनेर बायपासमार्गे परत यायचे आहे. हे अंतर सात तासांत पूर्ण करायचे आहे. सुरक्षेसाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स परिधान करून यायचे आहे. नियोजित वेळेत अंतर पूर्ण करणाऱ्याला प्रमाणपत्र आणि मेडल वितरित केले जाईल. विशेष म्हणजे मासिरकर आणि हर्डीकर हे स्वतः सायकलपटू आहेत. आदिवासी विभागाच्या उपायुक्त माधवी खोडे या सायकल स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. त्यादेखील रोज सकाळी नियमित सायकल चालवून दिनचर्या सुरू करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>