चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याची मुदत देताना काही अटी व शर्तीही घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता कर, बाजार विभागाशी संबंधीत वापर शुल्क, फेरीवाला व्यवसाय नोंदणी शुल्क आदीसंदर्भातील नोंदणी वसूली करण्याबाबत ८ नोव्हेंबरपूर्वी केलेली असावी. भरणा करून घ्यावयाच्या संबंधित कराची रक्कम ही मागणी केलेल्या रकमेच्या मर्यादेत असावी. रक्कम वादग्रस्त नसावी. तसेच कोणत्याही प्रतिसाक्षीत (अंडरसाइनींग) रक्कमेचा भरणा करणारी रक्कम स्वीकारण्यात येणार नाह, असे स्पष्ट करतानाच या पद्धतीने जमा करून घेण्यात येणारी रक्कम ही ना परतावा योग्य असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत मनपाच्या तिजोरीत २७ हजार २२४ नागरिकांनी १३.४४ कोटी रुपयांची मालमत्ता कर जमा झाला होता. बाजार विभागातील परवानाधारकांनीही पहिल्या पाच दिवसांत ९० लाख वापर शुल्क महापालिकेच्या निधीत जमा केला होता.
दरम्यान, मालमत्ता कर थकबाकीदार व चालू मागणी असलेले मिळकतदार, बाजार विभागाचे परवानाधारक आदी त्यांचा कर मनपाच्या झोन कार्यालयात व केंद्रीय कार्यालयातील वसुली केंद्रावर जावून भरण्याची मुभा होती. पहिल्या पाच दिवस मनपाच्या सर्वच झोन कार्यालयात करदात्यांची व थकबाकीदारांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, केंद्राने ही मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविल्यानंतर गर्दी ओसरत गेली. त्यानंतर गेल्या दहा दिवसात कर भरण्याची गर्दी बरीच रोडावली. ती २३.४ कोटीपर्यत गेली. एक अंदाजानुसार साधारणत: पाच हजारांवर नागरीकांनी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तर, बाजार परवाना असलेल्यांनीही दहा दिवसात केवळ २५ लाखाची भर घालत आकडा ११५ लाखावर पोहोचविली. दरम्यान, सरकारचा आदेश २४ नोव्हेंबरपर्यत आहे. सुधारीत आदेश आला तरच करदात्यांना मुदतवाढ मिळेल अथवा चलनातील नोटांनीच कर भरता येईल, असे सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांकडून ५.४२ कोटी
पाणी देयक भरण्यासाठीही पहिले पाच दिवस केंद्रांवर गर्दी झाली. ९ नोव्हेंबरपासून देयक भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर करण्यात आला. पहिल्या पाच दिवसात १६ हजार ३८८ ग्राहकांनी या मुदतवाढीचा लाभ घेतला. केवळ रोख रक्कमच नव्हे, तर धनादेश, लहान नोटा, डेबीट वा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट तसेच एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर) व आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आदी पद्धतीनेही देयक भरले गेले. ओसीडब्ल्यूकडून एक हजारापेक्षा कमी रकमेचे धनादेशही स्वीकारण्यात आले. जुन्या नोटा स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुढील आदेश आले नसल्याने ती रोखण्यात येईल असे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले. आतापर्यंत ४५ हजार ४५ग्राहकांकडून सुमारे ५ कोटी ४२ लाख ३९ हजार ८७० रूपये देयक जमा झाला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट