दारूगोळा, स्फोटके व शस्त्रांना आग लागल्यास केवळ पाण्यानेच आग विझवणे शक्य नाही. बरेचदा काही प्रकारच्या दारूगोळ्याला लागणारी आग विझवण्याकरता वेगळ्या प्रकारच्या यंत्रणेबरोबरच स्फोटकांसंबंधीची माहिती असणेही आवश्यक असते. मात्र, त्याची माहिती नसल्याने धोक्याचे ठरले. पुलगावमध्येही नागपूर महानगरपालिकेचे दहा कर्मचारी व तीन प्रशिक्षणार्थी गेले होते. मात्र, एका विशिष्ट सीमेपलीकडे त्यांना जाण्याची परवानगी नव्हती. दरम्यान, आगीमुळे स्फोट होऊन जे तुकडे परिसरात पडून त्यामुळे आग लागत होती, ते विझवण्याचे काम महापालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
या स्फोटातील मृतांना अग्निशमन विभागाच्या वतीने श्रदांजली वाहण्यात आली. शहरातून बरेचदा स्फोटकांची वाहतूक होते. त्यामुळे अशी स्थिती शहरात उद्भवल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांना त्यासंबंधी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्याबाबत विभाग सकारात्मतेने विचार करत असल्याचे उचके यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, यासंबंधी राज्याच्या अग्निशमन कायद्यात बदल होण्याची गरज आहे. अग्निशमन विभागाच्या महासंचलकांना त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, विधिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असणार आहे. पुलगावच्या घटनेत मृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट