त्रिलोक हा सफाई कर्मचारी आहे. त्याला सात हजार रुपये महिना मिळतो. नऊ वर्षांपूर्वी त्रिलोक याचे वडील आजारी होते. सीता या त्यांना तुलसी यांच्याकडे उपचारासाठी आणत होत्या. यातच त्यांनी ओळख झाली होती. दरम्या,न त्रिलोकच्या वडिलाचे निधन झाले. सीता यांना ३० हजार रुपये पेन्शन व २२ हजार रुपये पगार मिळायचा. यातून त्रिलोक याच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह व्हायचा. शिवाय घरही सीता यांच्याच नावावर होते. त्यांचा लालगंज भागात दबदबा होता. आठ वर्षांपूर्वी सीता यांनी तुलसी यांच्यासोबत लग्न केले. त्या जाटतरोडी येथे राहायला आल्या. सीता यांनी त्रिलोक याला पैसे देणे बंद केले होते. आईने दुसरे लग्न केल्याने समाजातही त्याची बदनामी झाली होती. काही दिवसांपूर्वी सीता यांनी लालगंजमधील घरही विक्रीला काढले होते. त्यामुळे त्रिलोक संतापला होता. त्याने तुलसी यांची हत्या करण्याचा कट आखला. बुधवारी दुपारी चेहऱ्याला दुपट्टा बांधून तो तुलसी यांच्या घरात घुसला. तुलसी यांच्या छातीवर सपासप वार केले. तुलसी यांना वाचविण्यासाठी सीता गेल्या असता त्रिलोक याने त्यांच्यावरही वार केले व पसार झाला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. इमामवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयावरून पोलिसांनी त्रिलोक याला ताब्यात घेतले. प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर त्याने हत्या केल्याचे मान्य केले. गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट