पूर्वी मोठ्या प्रमाणात आणि सहजगत्या आढळणाऱ्या सुगरण पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घसरणीला लागली असल्याचे पक्षीतज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. लोकसंख्येतील वाढ आणि विकास, यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुगरण पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी ही गणना केली जाणार आहे. ५ आणि १२ जून असे दोन दिवस ही गणना होणार आहे. पक्षीप्रेमी, पक्षीतज्ज्ञ, वनाधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या गणनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे. या पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज आल्यास त्यांच्याबद्दल जाणीवजागृती करणे, त्यांचे अधिवास असलेले गवताळ प्रदेश वाचविणे व त्यातून त्यांची संख्या वाढविणे, असे प्रयत्न करता येणार आहेत.
बीएनएचएसच्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामअंतर्गत या मोजणी उपक्रमाचे आयोजन देशभरात केले जाणार आहे. उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्यांच्या आवडीची कोणतीही जागा निवडावी आणि त्या अधिवासातील सुगरण पक्ष्यांची संख्या मोजावी, असे या गणनेचे स्वरुप आहे. मोजणीतून मिळालेली माहिती www.bnhs.org या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट