मध्य भारतातील हे अशा प्रकारचं पहिलंच बाळंतपण आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये १९८४ ला अशा प्रकारचं बाळ जन्माला आलं होतं. शाहीन नावाचे हे बाळ २००८ पर्यंत जिवंत होतं, अशी नोंद आहे. मात्र, हे बाळ किती दिवस, किती महीने किंवा किती वर्ष जगेल हे सांगता येत नाही. आठ महीने वाढ झालेले हे बाळ असून डॉक्टर यश बानाईत यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचं पथक त्याच्यावर उपचार करत आहे.
जनुकीय दोष असलेल्या या बाळाला त्वचेचा थर नाही. शिवाय आतील बाजूस तैल ग्रंथी विकसित झालेल्या नाहीत. सोबतच त्याच्या हातापायाची बोटेही लहान आहेत. कंजेनायटल ॲनामोली घेऊन तीन लाखांत एखादे बाळ जन्मते, असे डॉ. बानाईत यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट