दोन कोटी वृक्षारोपणाच्या मोहिमेकरिता खासगी रोपवाटिका चालकही एक पाऊल पुढे आले आहेत. या अभियानासाठी खासगी रोपवाटिकेतूनही शासकीय दरानेच रोपे पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नागपुरात वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी एक जुलैला होणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतला. त्यावेळी खासगी रोपवाटिकांमधूनही नागरिकांना स्वस्त दराने रोपे उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बचतभवन येथे याबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली. वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांनी प्रास्ताविकातून अभियानाच्या तयारीची रूपरेषा मांडली. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनसाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच रोजगार हमी योजनेसह इतर योजनांमधून तो उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिला. वृक्षलागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण यशदा येथे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्तरावर वृक्षलागवडीबाबत झालेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, विविध आमदार, वनबलप्रमुख सर्जन भगत तसेच इतर अनेक विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट