Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दप्तराच्या ओझ्याखाली शाळा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मुलांच्या किलबिलाटात सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. पहिलाच दिवस असल्याने फार कुणाच्या पाठीवर दप्तराचे ओझे दिसले नाही. मात्र, अधिक माहिती घेतली असता, दप्तर हलके व्हावे म्हणून शाळांनी फारसे प्रयत्न केले नसल्याचे आणि प्रशासनाने 'वॉच' ठेवणारी कठोर यंत्रणा उभारली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दप्तराचे ओझे कितपत कमी होईल, अशी शंका उपस्थित होत आहे.

मागील शैक्षणिक सत्रामध्ये दप्तरांचे ओझे कमी झाले पाहिजे, याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी रेटली जात होती. न्यायालयानेदेखील याबाबत पावले उचलण्याचे निर्देश शासनाला दिले होते. मात्र, शैक्षणिक वर्षाच्या मध्यात काही बदल करणे अशक्य असल्याने नव्या सत्रापासून दप्तरांचे ओझे कमी केले जाईल, असे शिक्षण विभागाकडून वारंवार सांगितले जात होते. सोमवारपासून विदर्भात नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवसापासून या व‌िषयाबाबत शासनाकडून काही निर्देश येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, असे कोणतेही आदेश किंवा सूचना आल्या नसल्याचे विविध शाळांच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी 'मटा'ला सांगितले.

कुणाचे ओझे, कुणी रिकामे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना आगाऊ वेळापत्रक न दिल्याने किंवा कोणत्याही स्पष्ट सूचना न दिल्याने विद्यार्थी पहिल्याच दिवशी जड दप्तरे घेऊन आल्याचे चित्र विविध ठिकाणी दिसून आले. अनेक विषयांची वह्या-पुस्तके घेऊन विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. काही शाळांमध्ये याउलटदेखील परिस्थिती आढळून आली. पहिला दिवस असल्याने केवळ प्रवेशोत्सव घेऊन विद्यार्थ्यांना लवकर सुटी देण्यात आली. त्यामुळे, एक किंवा दोन पुस्तके-वह्या घेऊन शाळेत आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांना वेळापत्रक दिले जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी 'मटा'ला दिली.

तपासणी लवकरच शाळेने पुस्तकांची यादी दिली आहे. मंगळवारपासून आठ पुस्तके आणि तीन वर्कबुक घेऊन येण्याचे बंधन शाळेने घातले आहे. वेळापत्रकच ठरवून दिले नसल्याने पहिल्याच दिवशी सर्व पुस्तके घेऊन आल्याची प्रतिक्रिया संकेत कठाणे व सूरज मानकर या दिघोरी परिसरातील विद्यार्थ्यांनी दिली. दरम्यान, दप्तरांचे ओझे तपासण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांमध्ये तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी भेटी देणाऱ्या चमूही तयार करण्यात आल्या आहेत. मागीलवर्षी फारच कमीवेळा शिक्षण विभागाच्या चमूने शाळांची तपासणी केली. यंदाही अद्याप याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही. 'शाळांची पाहणी आणि दप्तरांचे ओझे तपासण्यासाठी समिती तयार करण्यात आलेली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी ही तपासणी केली जाणार नाही. येत्या काळात या चमूंमार्फत दप्तराचे ओझे तपासले जाईल', अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>