विदर्भाच्या रंगभूमीवर गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत संजय भाकरे यांनी अनेक नाटकांतून भूमिका साकारल्या असून, संजय भाकरे फाउंडेशनच्या माध्यमातून नवी पिढी तयार करण्याचे कार्य करीत आहे. सात वर्षे रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर ते होते. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्कार तसेच स्मिता पाटील स्मृती पुरस्कारदेखील त्यांना प्राप्त झाला आहे. शिक्षक सहकारी बँकेत ते उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. प्रगती अशोक मानकर या अशोक प्रकाशन व अशोका एज्युकेशनल ट्रेडर्सच्या संचालिका असून, अनेक संस्थावर त्या कार्यरत आहेत. म. ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठानच्या त्या कोषाध्यक्ष आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट