Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

पेंचच्या वाघिणींची बोरिवलीत ‘बदली’

$
0
0



म.टा.प्रतिनिधी, नागपूर

वनविभागात चर्चेचा विषय ठरलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणींना अखेर या आठवड्यात पेंचमधून हलविणे जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात पुरेशी घसरण झाली असल्याने आता या वाघिणींना बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविले जाईल.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात असलेल्या टीएफ१ आणि टीएफ२ या ‌वाघिणींना जंगलात सोडण्याचा प्रयोग यशस्वी ठरला नव्हता. त्यानंतर या विषयावर सर्वेक्षण करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अहवाल दिल्यानंतर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले होते. त्यानुसार, या दोन्ही वाघिणींना यानंतर कधीही खुल्या जंगलात सोडले जाणार नाही, असा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांनी घेतला होता. व‌ाघिणींना कुठे सोडले जावे, याचाही आढावा घेण्यासाठी सांगण्यात आले होते. याशिवाय, भविष्यात अशी अनाथ शावके सापडल्यास त्यांच्याबाबत काय केले जावे, याचा निर्णय घेण्यासाठीही तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे.

टीएफ१ आणि टीएफ२ या दोन वाघिणींना ब‌ंदिस्त ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या जागेचा शोध घेणे वनविभागाने सुरू केले होते. अखेर, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे त्यांची रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. तेथील सफारीसाठी वाघिणींचा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे. उन्हाळ्यातील प्रचंड तापमानात वाघिणींना हलवणे जिकिरीचे होते. त्यामुळे, पावासाळा सुरू होऊन तापमानात घट होईस्तोवर वाट बघितली गेली. आता तापमान कमी झाले असल्याने वाघिणींना बोरिवली येथे हलविणे जाणार आहे. १० जुलैच्या सुमारास त्यासाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाची चमूदेखील त्यासाठी येथे येईल, अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>