Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

चंद्रपूर, यवतमाळात डाळीचे क्लस्टर उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर

यवतमाळसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा भागात मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळवून देण्यासाठी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात डाळीचे क्लस्टर उभारण्याचे प्रस्ताव तयार करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले.

चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक चंद्रपूर येथे झाली. यावेळी ते बोलत होते. अहिर म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात डाळीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येऊन त्यांचे उत्पादन जास्तीतजास्त कसे वाढेल यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

हळद, मिरची, हरभरा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे. या खरीप हंगामात बियाणे वाटप करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी करावी. त्यांनाही मार्गदर्शन करता येईल काय, यावही भर द्यायला हवा. या शेतकऱ्यांना खताचेही वाटप करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही अहिर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून फळबाग, भाजीपाला, दूध व्यवसाय व मधुमक्षिका पालन यासारखा जोडधंदा करण्यासाठी प्रोस्ताहित करण्यात यावे. शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना सर्व प्रकारची मदतही कृषी विभागातर्फे देण्यात यावी. त्याचप्रमाणे पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे. पैसे भरूनही वीज मीटर न मिळालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचे निर्देशही अहिर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>