लाइफलाइन रक्तपेढीच्यावतीने राष्ट्रीय रक्तदान महिना आणि रक्तदात्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त नागपुरात आले असता ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. हरीश वर्भे, संगीत किनी, डॉ. वनश्री वर्भे उपस्थित होत्या. भारत-पाकिस्तानदरम्यान १९७१ मध्ये छेडल्या गेलेल्या युद्धातून आयएसबीटीआय संघटना जन्माला आल्याचे नमूद करीत डॉ. रैना म्हणाले, ‘रणांगणावर जायबंदी झालेल्या शेकडो जवानांच्या गरजेतून ही संघटना उभी झाली. स्वेच्छा रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी पंजाबमधील काही लोकांनी एक सोसायटी तयार केली. हीच पुढे आयएसबीटीआय नावाने ओळखली जाते. तिचे काम आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. द्रवरूपात वाढणाऱ्या रक्तदानाच्या अर्थात प्रेमाच्या चळवळीने हे काम केले आहे.’
संगीत किनी म्हणाले, ‘रुग्णाला स्वच्छ आणि रोगमुक्त रक्त मिळावे म्हणून आयएफएसबी कार्यरत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये योग्य चाचणी होत नसल्याने बऱ्याच रुग्णांना हिपटॅटटिस बी, सी आणि एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे. रुग्णाला सुरक्षित रक्त मिळावे म्हणून आम्ही प्रयत्नरत आहोत.’
रक्तदानाचे नाबाद शतक
अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि पॅरा ऑलिम्पियन फेडरेशनचे उपाध्यक्ष विजय मुनिश्वर यांनी आतापर्यंत अनेकदा गरजूंना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. एक-दोन नव्हे तर त्यांनी आजवर रक्तदानाचीदेखील शतकी कामगिरी केली आहे. यानिमित्त त्यांचा डॉ. रैना यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट