जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या दालनात या कॅमेऱ्यांनी टिपलेले दृष्ट्य बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ कार्यालयीन वेळेतच नव्हे, तर घरी बसूनही आपल्या लॅपटॉपच्या साहाय्याने वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींवर नजर ठेऊ शकणार आहेत. सुटीच्या दिवशी, रात्री होणाऱ्या हालचालींवरही आता नजर राहणार आहे. १५ दिवसांचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पूर्वी केवळ ८ कॅमेरे होते. आता ३.२६ लाख रुपये खर्च करून २६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
राज्य शासनावर असलेला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढतात, आंदोलने करतात. कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात काहीच चुकीचे नाही. मात्र, अशा आंदोलनाच्यावेळी समाजविघातक प्रवृत्तीही त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा कृत्यांवर नजर असावी, यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याचबरोबर कामचुकार कर्मचाऱ्यांवरही या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट