पोलिस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर फोन करून येथे तैनात महिला कर्मचाऱ्याला,' तुम्ही मला खूप आवडता,'आय लव्ह यू' असे म्हणणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेते आहे. सक्करदरा भागात राहणारा १३ वर्षीय मुलगा सातव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील पानठेला चालवितात. गत काही दिवसांपासून हा विद्यार्थी पोलिस नियंत्रण कक्षात फोन करीत होता. 'चोरी झाली लवकर या, आग लागली, तुम्ही मला आवडता, आय लव्ह यू' असे म्हणत होती. या विद्यार्थ्याने तब्बल १४० वेळा पोलिस नियंत्रण कक्षात फोन लावला होता. उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मोबाइलधारकाचा छडा लावण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. यापुढे, असे करणार नाही,असे त्याच्या वडिलांनी लिहून दिल्यानंतरच त्याला सोडले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट